संघ आणि सावरकरांना लक्ष्य केल जातय – मोहन भागवत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच स्वातंत्रवीर सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी “सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम होती. स्वातंत्र्यानंतर ही मोहीम खूप वेगाने पुढे गेली. आत्ता, संघ आणि सावरकरांना लक्ष्य केले जात आहे,”असे विधान भागवत यांनी केले.

यावेळी भागवत म्हणाले की, आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील.

“वीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व असल्याचे यावेळी भगवत यांनी म्हंटले आहे.

सावरकरांबद्दल सत्य मांडले गेलेले नाही, त्यांचा फक्त द्वेष केला गेला. गांधीजींशी सावरकरांचे मतभेद होते, पण गांधीजींची प्रकृती बिघडली तेव्हा गांधीजींसारख्या महापुरुषाची गरज असून प्रकृती सांभाळून गांधीजींनी आंदोलन करावे असे सावरकर म्हणाले असल्याचीही माहिती यावेळी भागवत यांनी दिली आहे.

Leave a Comment