औरंगाबाद – फिक्की ज्युरीद्वारे भारतातील महिला सुरक्षा श्रेणीमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मा. मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अभिन्न या उपक्रमांची निवड करून फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार -2020 हा पुरस्कार मोक्षदा पाटील यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
मोक्षदा पाटील यांनी फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार-2020 या पुरस्कारचे श्रेय या अभिन्न टीममधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले असून, यामुळे महाराष्ट्र पोलिसांची देशपातळीवर मान उंचावली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना खेळांच्या माध्यमांतून स्त्री-पुरूष समानता तसेच कायद्याने व संविधानाने प्रदान केलेले अधिकार व कर्तव्य त्यांच्या मनात रूजवण्यासाठी अभिन्न हा उपक्रम हाती घेतला होता. यामध्ये जिल्हयातील अधिकारी, अंमलदार यांना याबाबत विशेष प्रशिक्षित करण्यात आले होते.
पोलीस अंमलदार यांनी मुलांकडून हे खेळ करून घेतले. या खेळांच्या माध्यमांतून त्यांना छेडछाडी, टिंगलटवाळी, रोडरोमिओगिरी, सायबर गुन्हे, अॅसिड अटॅक, बलात्कार, घरगुती हिंसा, कौटांबिक हिंसा, या विषयाप्रती संवदेनशिलता निर्माण केली. तसेच प्रत्येकाला त्यांचे न्याय हक्क व कर्तव्य यांची परिपूर्ण माहिती देवून मार्गदर्शन केले. या अभिन्न उपक्रमाला तरूणांमधून भरघोस प्रतिसाद व सहकार्य लाभले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group