नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी चालू आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) साठीच्या आर्थिक वृद्धीचा अंदाज 10.5 टक्के ठेवला आहे. RBI ने म्हटले आहे की, कोविड -19 संक्रमणातील वाढीमुळे आर्थिक विकास दरातील सुधारणेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
जीडीपी वाढीचा अंदाज 10.5%
आपल्या नवीनतम पतधोरण आढावामध्ये, आरबीआयने अंदाज व्यक्त केला की आर्थिक वर्ष 2021-22 मधील जीडीपी विकास दर 10.5 टक्के राहील. मागील पॉलिसी मीटिंगमध्येही RBI ने आर्थिक वर्ष 2022 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 10.5 टक्के ठेवला होता.
या अहवालात असे म्हटले आहे की,2021-22 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 10.5 टक्के होईल, पहिल्या तिमाहीत 26.2 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 8.3 टक्के, तिसर्या तिमाहीत 5.4 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.2 टक्के राहू शकतो.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) निर्णयांची घोषणा करताना सांगितले की, “सर्वांच्या सहमतीने हा निर्णयही घेण्यात आला की, जोपर्यंत टिकाऊ आधारावर वाढ राखणे आवश्यक असेल तोपर्यंत उदारवादी भूमिकेचे समर्थन केले जाईल आणि त्याद्वारे कोविड -19 चा अर्थकारणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”
रेपो दर 4 टक्के राहील
RBI ने रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याच वेळी अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी आवश्यकतेनुसार आणखी कपात करण्याची मागणी करून उदारवादी भूमिका कायम ठेवली. दास म्हणाले की,” मध्यवर्ती बँक प्रणालीमध्ये पुरेशी रोख रक्कम सुनिश्चित करेल, जेणेकरून उत्पादक क्षेत्रांना सहज कर्ज मिळेल. RBI ने म्हटले आहे की,”उत्पादन, सेवा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्या मागणीतील वाढीबाबत आशावादी आहेत, दुसरीकडे, कोविड -19 संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला आहे.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा