नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे अनेक लोकं आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. जर तुम्हाला कोरोना महामारीच्या काळात अचानक पैशांची गरज भासत असेल तर तुम्ही तुमच्या PF खात्यातून ऍडव्हान्स रक्कम काढू शकता. खरं तर, कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ने दुसऱ्यांदा लोकांना PF खात्यातून ऍडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या वर्षीही अशीच सुविधा देण्यात आली होती.
EPFO नुसार, PF ग्राहकांना तीन महिन्यांची बेसिक सॅलरी (बेसिक सॅलरी + महागाई भत्ता (DA) किंवा त्यांच्या PF खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 75 टक्के पर्यंत (जे कमी असेल), जे कमी असेल ते काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता आपण इच्छित असल्यास, कमी रकमेसाठी अर्ज देखील करू शकाल.
PF ऍडव्हान्स पैसे काढण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करा
>> EPFO चे युनिफाइड पोर्टल https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface च्या मेंबर इंटरफेसमध्ये लॉग इन करा.
>> आता ऑनलाईन सर्विसेजवर जा आणि क्लेम (फॉर्म -31,19,10 सी, 10 डी) वर क्लिक करा.
>> तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक टाका आणि व्हेरिफाय करा.
>> त्यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
>> आता आउटब्रेक ऑफ पेंडेमिक (कोविड-19) निवडा.
>> आपल्याला आवश्यक असलेली रक्कम एंटर करा.
>> आता बँक खात्याच्या चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा.
>> Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि OTP एंटर करा.
>> अशा प्रकारे तुमचा क्लेम सादर केला जाईल आणि तुमच्या बँक खात्यात 3 दिवसात पैसे जमा होतील.