हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Atal Pension Yojana : पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जर आपले पोस्ट ऑफिसमधील बचत खाते बंद झाले असेल किंवा या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम नसेल. तसेच यामुळे जर आपल्याला अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे जमा करता येत नसतील तर यासाठी आता चिंता करण्याची गरज नाही.
कारण अशा लोकांसाठी आता पोस्ट ऑफिसकडून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) विकसित करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या अनेक दिवसांपासून पोस्ट ऑफिसकडे याबाबत अनेक लोकांनी पत्रांद्वारे तक्रार केली होती. या पत्रांमध्ये अटल पेन्शन योजनेतील सदस्यांना पोस्ट ऑफिस बचत खाते बंद झाल्यामुळे किंवा खात्यामध्ये किमान शिल्लक नसल्यामुळे योगदान देता नाही, असे म्हटले गेले होते. पोस्ट ऑफिसने 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले गेले होते की,” ग्राहकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी आणि त्यांची APY पॉलिसी चालू ठेवण्यास मदत करण्यासाठी एक SOP तयार करण्यात आली आहे.” Atal Pension Yojana
अशा प्रकारे आपले पोस्ट ऑफिस बचत खाते अटल पेन्शन योजनेशी लिंक करा
आता ग्राहकाचे नवीन पोस्ट ऑफिस बचत खाते हे PY पॉलिसी प्रीमियम डेबिट लिंक केलेल्या कस्टमर इंफॉमेंशन फाइल (CIF) अंतर्गत उघडले गेले आहे कि नाही याची पोस्ट ऑफिसला खात्री करावी लागेल. तसेच आता पोस्ट ऑफिसमध्ये रेकॉर्डमध्ये जुन्याऐवजी नवीन पोस्ट ऑफिस बचत खाते क्रमांक असेल आणि तो ग्राहकाच्या अटल पेन्शन योजनेशी जोडला गेला पाहिजे हे देखील पाहावे लागेल.
सिंगल अकाउंटबाबत बोलायचे झाल्यास त्यासाठी CIF आयडी ऑटोमॅटिकली पॉप्युलेट होईल. मात्र जॉईंट अकाउंटसाठी CIF आयडी मॅन्युअली एंटर करावा लागेल. जे पोस्ट ऑफिसच्या शाखेद्वारे तपासले जाईल. तसेच CIF आयडीचे व्हॅरिफिकेशन झाल्यानंतर नवीन खाते योगदान डेबिटसाठी APY शी लिंक केले जाईल. Atal Pension Yojana
लेट पेमेंटसाठी भरावा लागेल दंड
हे लक्षात घ्या कि, या योजनेमध्ये जर अनेक दिवसांपासून पैसे जमा केले नसतील पोस्ट ऑफिसचे इंटर्नल सॉफ्टवेअर आणि रेकॉर्ड आपल्याला पेन्शन पॉलिसीसाठीचे प्रलंबित योगदान आणि दंडाची रक्कम देखील दाखवली जाईल. त्यामुळे ज्याच्या नावावर हे खाते असेल त्याला ही रक्कम भरावी लागेल. यानंतर, दंडासह थकबाकीची रक्कम वजा केली जाईल. मात्र, जर ते नवीन बचत खाते असेल तर त्यामध्ये पुरेशी शिल्लक रक्कम असणे आवश्यक आहे. यामध्ये दंडाची रक्कम 1 रुपये ते 10 रुपये प्रति महिना इतकी असू शकेल. Atal Pension Yojana
किती पेन्शन मिळेल ???
हे लक्षात घ्या कि, कर भरणारे नागरिक वगळता 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीयाला अटल पेन्शन योजनेमध्ये सामील होता येईल. तसेच या योजनेत 1,000 रुपये ते 5,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 60 वर्ष झाल्यानंतर त्याला पेन्शनची रक्कम दिली जाते. Atal Pension Yojana
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npscra.nsdl.co.in/scheme-details.php
हे पण वाचा :
Suryoday Small Finance Bank च्या FD वर मिळेल 9% पेक्षा जास्त व्याज
PAN-Aadhaar Link : 31 मार्चपर्यंत ‘हे’ काम करा अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय
UPI Transaction Limit : UPI द्वारे पैसे पाठवण्याचे लिमिट किती आहे ते जाणून घ्या
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का, MCLR वाढल्याने आता द्यावा लागणार जास्त EMI
Kotak Mahindra Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा