मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा ED समोर हजर होणार नाही, दिले ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एक मोठी कारवाई करत केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारिया पॉल यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावले होते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज पुन्हा एकदा ED समोर हजर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. जॅकलिननेही ED ला याबाबत माहिती दिली आहे. समन्स असूनही ED समोर हजर न होण्याची जॅकलीन फर्नांडिसची ही तिसरी वेळ आहे.

चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या व्यावसायिक बांधिलकीचा हवाला देत ED कडून काही वेळ मागितला आहे. जॅकलिनचे इन्स्टा अकाउंट बघितले तर त्यावरून कळते की, ती सध्या अक्षय कुमारसोबत ऊटीमध्ये शूटिंग करत आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्ट्स नुसार, जॅकलिनला 18 ऑक्टोबर रोजी ED समोर हजर राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याच्या संशयावरून चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठी बोलावले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलीन फर्नांडिस स्वतः सुकेश चंद्रशेखरच्या फसवणुकीची शिकार झाल्याची माहिती मिळाली आहे, मात्र या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी तपास यंत्रणा जॅकलीन फर्नांडिसची सविस्तर चौकशी करेल.

तपास संस्थेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत:-
1. आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही व्यावसायिक संबंध आहेत का?
2. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन किंवा कोणत्याही संबंधित कंपनी / प्रॉडक्शन हाऊसमध्ये कोणताही चित्रपट किंवा मालिका बनवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे की नाही?
3. हे दोघे एकमेकांना कसे ओळखतात?

सुकेश चंद्रशेखर करोडो रुपयांची फसवणूक कशी करतो
केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर त्याचा आवाज बदलतो आणि मोबाईल एप्लिकेशनद्वारे बनावट नावाने कॉल करतो. तपास यंत्रणेलाही माहिती मिळाली आहे की, तो वेगवेगळ्या लोकांच्या शैलीत आपला आवाज बदलण्यात तज्ज्ञ आहे. याचा फायदा घेऊन तो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत होता. तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीची व्याप्ती जसजशी पुढे जाईल तसतसे या प्रकरणात आणखी खुलासे होतील.

Leave a Comment