मुंबई । मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यादरम्यान आणखी एक चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. आयआयटी मुंबईने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पावसाळ्यात मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अधिक वाढेल त्यामुळं मुंबईत कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असं आयआयटी मुंबईने आपल्या अभ्यासात म्हटलं आहे.
आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची तीव्रता अधिक वाढेल. आर्द्रता वाढल्यामुळे कोरोना विषाणू दीर्घकाळ वातावरणात जिवंत राहू शकतो असा या अभ्यासातून दावा केला आहे. हा अभ्यास आयआयटी मुंबईच्या दोन प्राध्यापकांनी केला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, खोकला किंवा शिंकलेल्या थेंबाला जास्त तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे कोरडे पडण्यास कमी वेळ लागतो. परंतु पावसाळ्यात ओलावा राहील आणि लोकांचा खोकला कोरडा होण्यास जास्त वेळ लागेल. यामुळे, संसर्ग होण्याची आणि पसरण्याची शक्यता आहे. हे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
इतर देशांतील प्रकरणांचा देखील संशोधनासाठी समावेश आहे. या ताज्या संशोधनानुसार, थेंब कोरडे (ड्रॉपलेट) होण्यासाठी सिंगापूरने कमी लागला आणि जास्त वेळ न्यूयॉर्कमध्ये लागला. म्हणूनच न्यूयॉर्क हे जगातील कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या शहरांपैकी एक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईने वुहानला मागे टाकले आहे. आतापर्यंत वुहानमध्ये ५०३४० कोरोनाबाधितांचा आकडा नोंदवला गेला आहे. पण आता मुंबईत ५१,१०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना संसर्गाची अशी परिस्थिती केवळ मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातही कोरोना संसर्ग अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in