Monsoon Tourism 2023 : पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी Top-5 सुरक्षित ठिकाणे; पर्यटनही करा अन् निसर्गाचा आनंदही घ्या

Monsoon Tourism 2023 top treks
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा संपत आला असून महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा राज्यातील नागरिक करत आहेत. परंतु येत्या आठवड्याभरात पूर्णपणे पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्वतवण्यात येत आहे. पावसाळयात पर्यटन (Monsoon Tourism 2023) म्हणून अनेकजण गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यावर भर देतात. परंतु किल्ला सर करताना स्वतःच्या सुरक्षतेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. तुम्ही सुद्धा यंदाच्या पावसाळयात वेगेवेगळ्या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सुरक्षित अश्या 5 गडकिल्ल्यांबाबत सांगणार आहोत ज्याठिकाणी जाऊन तुम्ही ट्रेकिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

Korigad
Korigad

 

1. कोरीगड किल्ला (Korigad Fort) –

लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा कोरीगड किल्ला हा सर्वात लहान आणि महत्त्वाचे म्हणजे ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा आहे. त्यामुळे जे पहिल्यांदाच ट्रेकिंग करणार आहेत त्यांच्यासाठी हा किल्ला सर करणे म्हणजे चांगली ट्रायल ठरू शकते. ट्रेकची सुरुवात पेठ शाहपूर येथून होते, ज्यामुळे तेथे बस किंवा कारने जाणे सोपे राहते. गडावर जायचे दोन मार्ग आहेत .उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. ट्रेकिंगच्या मार्गावर तुम्हाला किल्ल्याची माहिती देणारे बॅनर पाहायला मिळतात. कोरीगड किल्ला परिसरातील आल्हाददायक वातावरणाने तुमचं मन नक्कीच मोहित होईल. परंतु ट्रेकिंग करताना बुरुजाजवळ सेल्फी घेण्याचा धोका पत्करू नका.

Kalsubai
Kalsubai

 

२) कळसूबाई (Kalsubai) –

ज्यांना आव्हानात्मक ट्रेकिंग आवडत अशा पर्यटनासाठी कळसुबाई ट्रेकिंग हे योग्य ठिकाण ठरेल. अहमदनगर जिल्ह्यातील हे शिखर म्हणजे निसर्ग पाहण्याचा सर्वात मोठा आनंद आहे. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेलं कळसूबाई हे जरी आव्हानात्मक असलं तरी एका दिवसात तुम्ही तो पूर्ण करू शकता. त्यामुळे दरवर्षी इथे ट्रेकिंगसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. याठिकाणी ट्रेकिंगची सुरुवात बारी शहरापासून होते. कळसुबाई ट्रेकिंग करताना तुम्हाला सुंदर लँडस्केप, हिरवीगार शेती पाहायला मिळेल. या शिखरावर जाताना अधून मधून शिड्याही बसवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे हा ट्रेक तस म्हंटल तर सोपाही ठरतो. ट्रेकिंगचा रास्ता मोठा असला तरी सुरक्षेची काळजी मात्र घ्यावीच लागेल.

Rajmachi Fort
Rajmachi Fort

 

३) राजमाची किल्ला (Rajmachi Fort) –

खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला होय. राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंग करणं म्हणजे तुमचा दिवस अतिशय उत्तम घालवणे. हा सुद्धा एक सोपा ट्रेक असून नवीन माणसासाठी अतिशय योग्य आहे. पावसाळ्यात राजमाची किल्ल्यावर ट्रेकिंग करणं म्हणजे तर निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या अर्थाने जाणं. याठिकाणी तुम्हाला उदयसागर तलाव, कातळधार धबधबा, ड्यूक्स नोज, ढाक बहिरी, शिरोटा तलाव अनुभवायला मिळेल. ट्रेकिंगसाठी रस्ताही मोठा आहे आणि स्थानिक लोकही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. पायथ्याला उधेवाडी गांव असून गावातील घरांमध्ये राहण्याची सोय सुद्धा होते.

Lohgad
Lohgad

४) लोहगड किल्ला (Lohagad )-

लोहगड ट्रेक हा लोणावळा परिसरातील अगदी आवडता असलेला किल्ला होय. दरवर्षी पावसाला चालू झाला कि ट्रेकिंग साठी पर्यटकांची पावले आपोआपच लोहगडाकडे वळायला लागतात. गडाची स्थिती अतिशय चांगली असून सुरक्षतेच्या दृष्टीनेही हा किल्ला ट्रेक करणं अतिशय योग्य आहे. लोहगडावर विंचुकडा, उलटा धबधबा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. लोहगड किल्ल्यावरून पवना धरणाची उत्कृष्ट दृश्ये, निसर्ग सौंदर्याचा खराखुरा अनुभव तुम्हाला घेता येईल. खास करून विकेंडला याठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळते. लोहगडला जाण्यासाठी तुम्हाला मुंबई किंवा पुण्यावरून मळवली स्थानकावर यावं लागेल, तेथून तुम्ही लोहगडच्या दिशेने जाऊ शकता.

Karnala Fort
Karnala Fort

५) कर्नाळा किल्ला (Karnala Fort) –

पनवेल विभागात येणारा आणि रायगड जिल्ह्यात येणार कर्नाळा किल्ला सर करणे अतिशय सोप्प काम आहे. त्यामुळे ट्रेकिंग करण्यात नवे आहेत अशा लोकांनी आवर्जून याठिकाणी भेट द्यावी. किल्ल्याच्या पायथ्याशी दाट जंगल आहे. पायथ्यापासून वर जायला तुम्हाला 2 तासांचा वेळ लागेल. यादरम्यान तुम्ही नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या किल्ल्यावर जाणाऱ्या दोन पायवाटा आहेत – कर्नाळा किल्ल्याची पायवाट आणि नैसर्गिक पायवाट. तुम्हाला कर्नाळा किल्ल्यावर जायचं असेल तर पनवेल पासून बस पकडावी लागेल किंवा तुमच्या खासगी वाहनाने सुद्धा तुम्ही याठिकाणी येऊ शकता. सुरक्षित ट्रेकिंग साठी कर्नाळा किल्ला नक्कीच योग्य आहे.