Monsoon Tourism : लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो!! पर्यटकांची तुफान गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झालं असून सर्वच शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी (Monsoon Tourism) अनेकजण उत्सुक असतात. निसर्गरम्य वातावरणात जाऊन, टेकड्या, डोंगरदरे आणि धबधबे पाहण्यासाठी अनेकजण पावसाळ्याची वाट पाहत असतात. अशाच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यामधील प्रसिद्ध असे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.

पर्यटकांची पाऊले भुशी धरणाकडे – (Monsoon Tourism)

पावसाळ्यात लोणावळा हे पर्यटकांचे (Monsoon Tourism) मुख्य आकर्षण असते. दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी येऊन धमाल मस्ती करत असतात. त्यातच गेल्या गेल्या २४ तासांत लोणावळ्यात 158 मिमी पाऊस बरसला आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने आज याठिकाणी असलेले भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले. भुशी डॅमच्या पायऱ्यावरून पाणी वाहत असून परिसरातील धबधबेदेखील वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आपोआप लोणावळ्याच्या दिशेने वळू लागली आहेत.

भुशी धरण परिसरात तरुणांपासून ते लहान मुलंही धो धो पावसात आणि धरणाच्या पाण्यात उतरून आपला आनंद लुटत असतात. खास करून पावसाळ्यात (Monsoon Tourism) याठिकाणी नैसर्गिक दृश्य आणखी खुलून दिसत. भुशी डॅम परिसरात इतकी गर्दी असते कि उभं राहायला सुद्धा कधी कधी जागा मिळत नाही. मागील वर्षी जून महिन्यात भुशी धरण ओव्हरफ्लो झालं होत, परंतु यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने भुशी धरण ओव्हरफ्लो व्हायला पर्यटकांना जुलै महिन्याची वाट पाहावी लागली. इथून पुढे याठिकाणी पर्यटकांची आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.