राज्यात कोरोनाचा खाकीवर हल्ला आणखी तीव्र; कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1000 पेक्षा जास्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत आघाडीवर लढणाऱ्या पोलीस योद्ध्यांवर कोरोनाने आपला हल्ला अधिक प्रखर केला आहे. मागील काही दिवसांत पोलिसांमध्ये कोरोनाच्या संसर्ग वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 113 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात तब्बल 221 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1007 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून 113 जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झालेल्यां पोलिसांमध्ये 901 कर्मचारी आणि 106 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

तर मुंबई पोलीस दलातील ४ आणि पुणे, नाशिक, सोलापूर पोलीस दलातील प्रत्येकी एका पोलिसाने प्राण गमावले आहेत. दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजारांपेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबईत 13 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”