हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्येचा राजा राम यांच्या मंदिरासाठी मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे हे मंदिर कधी दर्शनासाठी खुले होते याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. यातच आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 22 जानेवारी 2024 ला या मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांची गर्दी होणार आहे म्हणून भारतीय रेल्वेने यासाठी तब्बल 1000 हुन अधिक सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
19 जानेवारी 2024 पासून सुरु होतील या ट्रेन
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे पहिल्या 100 दिवसात येथे भाविकांची गर्दी प्रचंड मोठी असणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या दिवसाची वाट अनेक राम भक्त बघत होते. आणि आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे निश्चितच गर्दी असणार आहे. म्हणून भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या गाड्या 19 जानेवारी पासून सुरु होणार आहेत.
कोणत्या ठिकाणहून सोडल्या जातील या विशेष ट्रेन?
भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह अनेक प्रमुख शहरांमधून अयोध्येला जाणाऱ्या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. यामुळे येणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही बाब सोयीची होईल. तसेच यामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता IRCTC कडून 24 तास जेवणाची सोय करण्यात येणार आहे. या विशेष ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाल्यास या गाड्यांची संख्या वाढवली जाईल असा अंदाज आहे.
एकूण 7000 जणांना देण्यात आले विशेष आमंत्रण
या दिवसासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. त्यामुळे ही प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तब्बल सात हजार जणांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. मोदींच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच अभिषेकही केला जाणार आहे. या सात हजार मध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य असा होणार आहे. हे लक्षात येते.