भारतात 11% पेक्षा जास्त प्रौढ लोकांना झोपेशी निगडित आहे ‘हा’ आजार; AIMMS ने केला दावा

adult people
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील आरोग्य क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे AIMMS. सध्या  AIMMS ने केलेल्या अभ्यासपुर्ण संशोधनाची भारतात चर्चा  होत आहे. AIMMS ने केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, भारतातील 11 % पेक्षा जास्त प्रौढ लोकांना झोपेशी निगडित आजार आहे. ह्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की भारतातील बरेच जण Obstructive Sleep Apnea (OSA) ह्या आजाराची  शिकार आहे. त्यामुळे अनेक जणांना आपल्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.

Obstructive Sleep Apnea (OSA ) म्हणजे काय?

Obstructive Sleep Apnea या आजारामध्ये तुमच्या झोपेदरम्यान तुमच्या नाकावाटे होणारा हवेचा प्रवाह अचानकपणे बंद होतो किंवा तुमची नाकावाटे होणारी श्वास घेण्याची प्रक्रिया खंडित होऊन तोंडाच्या मार्गाने चालू लागते. त्यामुळे तुमची रात्री बऱ्याच वेळी झोपमोड होते. संपूर्ण रात्रीत ही घटना  बऱ्याचदा  होते. त्यामुळे तुमची  झोप व्यवस्थित  होउ शकत  नाही. AIMMS ने केलेल्या अभ्यासानुसार हे प्रमाण महिलांपेक्षा पुरुष्यामध्ये अधिक आहे असे आढळून  आले आहे.

Obstructive Sleep Apnea (OSA ) का होतो?

आरोग्य तज्ञांच्या मते, OSA तेव्हा उद्भवते जेव्हा जीभ सारख्या तुमच्या घशातील मऊ उतींना (muscle )आधार देणारे स्नायू शिथिल होऊ लागतात, ज्यामुळे तुमचा वायुमार्ग अत्यंत अरुंद होतो किंवा अगदी जवळ येतो आणि क्षणार्धात श्वास घेणे बंद होते. याचं कारणामुळे तुम्हाला झोपेत घोरण्याचा देखील त्रास होतो. हा OSA चाच  एक  भाग  आहे.

काय  Obstructive Sleep Apnea ची  लक्षणे  : 

OSA असणाऱ्यांना नेहमीच  झोपमोड होत असते . श्वासोच्छ्वास  पुर्ण होउ शकत नाही. त्यामुळे त्यांना अनेक वेळी त्रास सहन  करावा  लागतो.

OSA असणाऱ्यांमध्ये मुखत्वे ही लक्षणे  दिसून येतात.

• जोरात घोरण

• श्वासोच्छवासासाठी दम लागतो

• गुदमरणे

• घोरणे

•धाप लागणे

•डोकेदुखी

• तंद्री

• नैराश्य