कोरोनाचा हाहाकार सुरूच!! सलग दुसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

corona test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला.

आतापर्यंत देशात 1 कोटी  76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 34 हजार 83 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 36 लाख 45 हजार 164 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २९ कोटी ८६ लाख ०१ हजार ६९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १८ लाख २६ हजार ४९० नमुन्यांची करोना चाचणी गुरुवारी करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.