साताऱ्यातील चाळकेवाडीत ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण; 40 हून अधिक बाधित

0
70
Gastro Chalkewadi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साताऱ्यातील पवनचक्कीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाळकेवाडी येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून 40 हून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आरोग्य अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे.

ठोसेघर येथील ग्रामस्थ गॅस्ट्रोने बाधित झाले असून त्यांच्यावर ठोसेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तर काहींवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ओढ्याचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाले होते. त्यातच ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्याने पाण्यात क्लोरोफार्म न मिसळल्याने पाणी दूषित होऊन ही बाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

पावसाळाच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटकाही ग्रामस्थांना बसला आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here