हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून संकट वाढलं आहे. दरम्यान राज्यात सलग दुसऱ्या दिवशी तब्बल ८ हजार नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
गुरुवारी राज्यात ८ हजार ७०२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल बुधवारी ८ हजार ८०७ करोनाबाधितांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आजचे प्रमाण किंचित कमी आहे.
राज्यात आज करोनामुळे ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ८० रुग्णांचा मृत्यू झाला होता सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर २.४४ टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के एवढे आहे. राज्यात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. २,५२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत आज १ हजारांहून अधिक रुग्णमुंबईत गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १ हजार १४५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ४६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’