राज्यात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवसात सापडले 5 हजार रुग्ण

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला असून काल दिवसभरात तब्बल 5 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. तसेच ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत देखील लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा वाढता विस्फोट पाहता राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.

काल दिवसभरात राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १९८ नवीन ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय, २२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गुरुवारी तब्बल 3 हजार 928 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईतील निर्बंध आणखी कडक केले आहेत. पार्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निर्बंध आणले गेले आहेत.