मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब (bomb) असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानामध्ये एकूण 236 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स होते. यानंतर बॉम्बशोधक (bomb) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विमानाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रशियाच्या दूतावासाला मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब (bomb) असल्याची धमकी मिळाली होती. त्यांनी लगेच याची माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

यानंतर या विमानातील 236 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर्स या सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच गुजरात पोलीस, बॉम्ब (bomb) शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच एनएसजी कमांडोही दाखल झाले असल्याची माहिती जामनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरभ पारघी यांच्याकडून देण्यात आली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!