Review: ‘द फॅमिली मॅन २’ हटके कि फ्लॉप..? श्रीकांतवर राजीचा पलडा भारी..?; लगेच जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर अनेक दिवसांची मोठी प्रतीक्षा संपली. अमेझॉन प्राईमच्या ‘द फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेबसीरिजचा दुसरा भाग अर्थात ‘द फॅमिली मॅन २’ रिलीज झाला आहे. यातही अभिनेता मनोज वाजपेयींचा दमदार अभिनय आपल्याला पाहायला मिळतो आहे. मात्र यात त्याला स्पर्धा देण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी पूर्ण तोडीची भूमिका साकारली आहे.

त्यामुळे आता हा सीझन नेमका कसा आहे? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर हा रिव्ह्यू नक्कीच तुमच्या कमला येईल. अगदी कमी शब्दात जास्त सांगायचं झालं तर हा सीजन म्हणजे थरार.. जबरदस्त… रोमांचक आणि खिळवून ठेवणारा अश्या अनेक लहान शब्दांत याचे कौतुक करता येईल.

तसे कथानकाबाबत बोलायचे झाले तर पहिल्या सीझनमध्ये सिरीजचा नायक श्रीकांत अर्थात मनोज बाजपेयी दिल्लीला गॅस अटॅकपासून वाचविण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता श्रीकांत एनआयएच्या टीममधून बाहेर पडला आहे. यावेळी तो एका आयटी कंपनीत चक्क नोकरी करतोय. श्रीकांत स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या बॉसकडून येणाऱ्या ऑर्डर फॉलो करतोय. तर कधी कधी त्याच्या शिव्या खातोय. आयुष्यातल उरलं सुरलं थ्रील संपल्याने ते बोरिंग म्हणजे कंटाळवाणे झालेय असे त्याला वाटते.

पण तरिही पत्नीला (अर्थात अभिनेत्री प्रियामणी) अधिकाधिक खूश करण्याचा प्रयत्न करतोय. अशात तळपदे त्याला वडापावची आठवण करून देतो. पण श्रीकांत वेळोवेळी स्वत:च्या मनाला मारून मुटकून समजावताना दिसतोय. अर्थात तळपदेकडून टास्क अपडेट घेण्याची त्याची सवय अजूनही काही सुटत नाहीये. नेमके अशातच काही असे घडते की, श्रीकांतला पुन्हा एकदा फुल ऑन अ‍ॅक्शनमध्ये याव लागत. तो पुन्हा एकदा एका नव्या आव्हानात्मक मिशनवर निघतो.

तामिळनाडू ते श्रीलंका येथून ही कथा थेट लंडनमध्ये पोहोचते. यादरम्यान त्याला राजी नावाच्या क्रूर शत्रूचा सामना करावा लागतो. राजीची ही गंभीर आणि फोकस्ड भूमिका समंथा अक्कीनेनीने साकारली आहे. दुस-या सिझनमध्ये जेवढी श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयीबद्दल उत्सुकता आहे तेवढीच समंथाबद्दलही आहे, यात काही वादच नाही. ती पहिल्या सिझनमध्ये तर नव्हती.

पण दुस-या सिझनमध्ये मात्र तिची एकदम हटके, जबरदस्त अशी दमदार भूमिका आहे. यात श्रीकांत राजीला कशी मात देतो आणि अखेर या मिशनचा शेवट कसा होतो, यासाठी अर्थातच तुम्हाला ९ एपिसोडची ही वेब सीरिज पूर्ण पाहावी लागेल. मात्र सीरिजबद्दल आणखी काही सांगायचे झाले तर हि वेबसिरीज खरोखरच बघण्या लायक असून तुम्हाला खिळवून ठेवणारी आहे. नक्कीच शेवटपर्यंत काय होणार याची उत्सुकता तुम्हाला हि सिरीज पूर्ण पाहायला भाग पाडेल.

‘द फॅमिली मॅन २’मधील श्रीकांतची भूमिका साकारणा-या मनोज बाजपेयीच्या चेह-यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्या आहेत. पण श्रीकांतच्या कॅरेक्टरमध्ये तो आधीइतकाच परफेक्ट आहेत. मुख्य भूमिका साकारणारा मनोज पूर्ण सीरिजमध्ये खिळवून ठेवतो.या सिरीजचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ही टिपिकल स्पाय थ्रीलर जॉनरची सीरिज नाही. तर यात तुम्हाला अनेक विनोदी प्रसंग देखील पाहायला मिळतात. ‘द फॅमिली मॅन २’ कडून प्रेक्षकांना अनेक अपेक्षा होत्या. या अपेक्षा पाहता हा सीझन खरोखरच अपेक्षापूर्ती आहे असे म्हणायला हरकत नाही. श्रीकांतच्या फॅमिलीवर या सीझनमध्ये जरा अधिक लक्ष केंद्रित केले आहे जे कथानकाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. पण म्हणून थ्रील आणि सस्पेन्स यात कोणताही भेदभाव केलेला नाही.

दिग्दर्शक मास्टर राज व डीके यांनी या सीझनचे फक्त चार एपिसोडच दिग्दर्शित केले आहेत. यात पहिल्या, दुस-या, सहाव्या व नवव्या एपिसोडचा समावेश आहे. उर्वरित पाच एपिसोड सुपर्ण एस. वर्मा यांनी दिग्दर्शित केले आहेत. प्रत्येक एपिसोड हटके आणि दमदार आहे. एक एपिसोड संपला की लगेच पुढचा पाहण्याची इच्छा अनावर होणे, हेच दिग्दर्शकाचे यश. या सिरीजमध्ये निश्चितच मनोज फर्स्टक्लास आहे. पण समंथानेही खलनायक अगदी जीव ओतून साकारला आहे. शिवाय अन्य कलाकारांनीही त्यांच्या वाट्याच्या भूमिका पूरेपूर न्याय देत साकारल्या आहेत. या सीरिजमध्ये काही संवाद हे तामिळ भाषिक आहेत. ते काही जणांना खटकू शकतात. पण एकूण सीरिजबद्दल म्हणाल तर, खरंच काबिल ए तारीफ..

You might also like