Airtel Recharge Plan : Airtel चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; महिन्याला फक्त 150 रुपये खर्च, पण मिळतात खास फायदे

Airtel Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Airtel Recharge Plan) मोबाईल युजर्स कायम एका अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतात जो त्यांना अधिक लाभ देऊ शकतो. अनके युजर्स हे वार्षिक प्लॅनचा वापर करतात. म्हणजे एकदा रिचार्ज केला की वर्षभर टेन्शन घ्यायची गरज नाही. मुख्य म्हणजे वर्षभराचा रिचार्ज प्लॅन घेतल्यास तुमचा खर्चसुद्धा कमी होतो. आज आपण अशाच एका स्वस्त आणि मस्त वार्षिक रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये एकदा रिचार्ज करून तुम्ही वर्षभर वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

आज आपण ज्या रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर तुमचं सिमकार्ड चालू राहील. एअरटेलचा १७९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा वार्षिक वैधतेसोबत विविध सुविधा प्रदान करतो. मुख्य म्हणजे, या हा रिचार्ज प्लॅन स्वस्तसुद्धा आहे. चला तर जाणून घेऊया एअरटेलच्या स्वस्त वार्षिक प्लॅनविषयी सविस्तर माहिती.

Airtel चा १७९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan)

Airtel आपल्या ग्राहकांना १७०० रुपयांचा वार्षिक प्लॅन ऑफर करतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ३६५ दिवसांची म्हणजेच १ वर्षाची वैधता मिळते. अर्थात १२ महिन्यांसाठी हा रिचार्ज तुम्हाला सुविधा प्रदान करतो. या प्लॅनमध्ये १ वर्षाच्या वैधतेसह प्रतिमहिना 2GB डेटा मिळतो. अर्थात वर्षभरासाठी 24GB डेटा ग्राहकांना मिळतो. तसेच हाय स्पीड डेटाची दैनिक मर्यादा संपल्यास मोबाइल डेटा 64kbps च्या वेगाने वापरता येईल.

(Airtel Recharge Plan) इतकेच नव्हे तर एअरटेलच्या या वार्षिक प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. शिवाय तुम्हाला वर्षभर ३६०० मोफत SMS करण्याची सुविधा मिळते. या प्लॅनअंतर्गत एअरटेलची योजना Xstream ॲप प्रीमियम, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन, मोफत हॅलो ट्यून आणि अमर्यादित डाउनलोडची सुविधा देखील मिळते.

स्वस्त आणि मस्त वार्षिक रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा १७९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन हा तसं पाहिलं तर मासिक स्वरूपात स्वस्त पडतो. (Airtel Recharge Plan) कारण प्रतिमहिना या रिचार्ज प्लॅनमध्ये १५० रुपये इतकाच खर्च येतो. म्हणजेच एका महिन्यासाठी १५० रुपये खर्च केल्यास अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि इतर लाभ मिळतात. हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल, मोफत SMS आणि अनलिमिटेड डाउनलोडची सुविधा प्रदान करतो.

आता साहजिकच हा प्लान एकदा खरेदी करताना पाकिटावर ताण येतो. मात्र, यानंतर वर्षभर पुन्हा पुन्हा पाकीट उघडण्याची गरज पडत नाही. शिवाय या रिचार्ज प्लॅनची १ महिन्याची किंमत पाहिली तर ती फक्त १५० रुपये आहे. त्यामुळे हा प्लॅन स्वस्त आणि तितकाच मस्त आहे असे म्हणायला हरकत नाही. (Airtel Recharge Plan)