सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यात सर्वात जास्त कोरोना साताऱ्यात आहे. त्याच्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मी आलो तर तुम्ही बुके घेऊन येता. तुमचे आमच्यावर, साहेबांच्यावर आणि राष्ट्रवादीवर प्रेम आहे. त्याबद्दल दुमत नाही, आपण नियम पाळा बाबानों असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच झापले.
सातारा येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीसाठी आलेले आहेत. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखरसिंह आदी उपस्थित होते.
सातारा येथे अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सातारा येथे आगमन झाले. कोरोनाच्या बैठकीसाठी आलेले असताना कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत बुके आणल्याचे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार थोडे रागावले असल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा बुके घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच झापले, आणि म्हणाले आता बुके घेतला नाही तर अजित पवारांनी पुन्हा म्हणणार बुके घेतला नाही.