Google Search : गुगल हे कोणत्याही गोष्टी सहज शोधायचे साधन आहे. यामध्ये प्रत्येकाचा हेतू हा वेगवेगळा असू शकतो. दरम्यान आज आम्ही तुम्हाला . 2023 मध्ये इंटरनेटवर मुलींनी सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये केवळ ‘ट्रेंडिंग मीम’च नव्हे तर ‘निअर मी’ सारख्या विषयांची टॉप-10 यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही पाहिलंच असेल की सध्या गुगलवर Near Me या ऑप्शनद्वारे अनेक गोष्टी शोधल्या असतील, पण तुम्हाला माहिती आहे का की लोकांनी इंटरनेटवर त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सर्वात जास्त काय सर्च केले आहे? जर नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे.
हिंदीमध्ये सर्वात जास्त काय शोधले गेले?
जर आपण हिंदीमध्ये सर्वाधिक सर्च केल्याबद्दल बोललो तर असे दिसते की 2023 मध्ये मुलींनी सर्वात जास्त त्यांच्या जवळील ब्युटी पार्लर शोधले. खरं तर, जेव्हा बहुतेक लोकांनी हिंदीमध्ये काहीतरी शोधले तेव्हा मुलींनी फक्त ‘मेरे पास के ब्यूटी पार्लर’ असे शोधले आहे. एकूणच बोलायचे झाले तर निअर मी पर्यायामध्ये सहाव्या क्रमांकावर शोधण्यात आले. लग्नाच्या मोसमात मुलींना जवळच्या ब्युटी पार्लरची माहिती हवी असते आणि अशा परिस्थितीत त्यांना गुगलच्या Near Me श्रेणीची खूप मदत मिळाली. याच कारणामुळे गुगलने त्याला टॉप-10 सर्च लिस्टमध्ये ठेवले आहे.
मुलींनी टॉप 10 सर्च केलेल्या गोष्टी जाणून घ्या.
जर आपण इतर गुगल सर्चबद्दल बोललो, तर ‘Earthquake near me’ दुसऱ्या क्रमांकावर आहे, Zudio near me तिसऱ्या स्थानावर आहे, ‘Onam sadhya near me’ चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर जेलर मूव्ही नियर मी आहे. यामध्ये सहाव्या क्रमांकावर ‘मेरे पास के ब्यूटी पार्लर’ असे मुलींनी सर्च केले आहे. सातव्या क्रमांकावर ”मेरे पास के जिम” शोधण्यात आले आहे, आठव्या क्रमांकावर ‘रावण दहन नियर मी’ शोधला गेला. तर नवव्या आणि दहाव्या क्रमांकाला ‘माझ्या जवळील त्वचारोगतज्ज्ञ’ आणि ‘माझ्या जवळ टिफिन सेवा’ असे सर्च करण्यात आले आहे.
टॉप-10 गुगल सर्च लिस्ट-
– Coding Classes near me
– Earthquake near me
– Zudio near me
– Onam sadhya near me
– Jailer movie near me
– मेरे पास के ब्यूटी पार्लर
– मेरे पास के जिम
– Ravan Dahan near me
– मेरे पास के त्वचा विशेषज्ञ
– मेरे पास के टिफ़िन सर्विस