Wednesday, October 5, 2022

Buy now

धक्कादायक ! सोलापुरात मायलेकांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापुर शहरातील शेळगी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आईने आणि मुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. उमादेवी पुराणिक आणि दिग्विजय पुराणिक असे आत्महत्या (Sucide) केलेल्या मायलेकाचे नाव आहे. या दोघांनी आत्महत्या (Sucide) का केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

सकाळपासून घरातून कोणतीच हालचाल किंवा आवाज येत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना शासकीय रुग्णालय नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जोडभावी पेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सोलापुरातील शेळगी परिसरात उमादेवी आणि दिग्विजय हे दोघे मायलेक राहतात. त्यांच्या घरातून सकाळपासून कोणत्याच हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता मायलेक एकाच साडीने गळफास (Sucide) घेतल्याचे आढळून आले. यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ जोडभावी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या मायलेकांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरुन केली हे अजून समजू शकलेले नाही पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :

Share Market : गेले तीन दिवस बाजारामध्ये तेजी का आली ???

प्राचीने इतिहास रचला ! पॅरा वर्ल्ड कपमध्ये ‘कॅनो’त पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!!

BSNL ची खास ऑफर !!! एकदाच रिचार्ज करून मिळवा 1 वर्षापेक्षा जास्त व्हॅलिडिटी

कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला, कारसुद्धा पेटवली