धक्कादायक ! रहाटणीत मायालेकींची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
30
sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना शनिवारी सकाळी सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे घडली आहे. सुनीता युवराज नवले, श्रावणी युवराज नवले असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत.

मृत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले होते. त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. यानंतर युवराज नवले हे टेरेसवर झोपण्यासाठी गेले. यादरम्यान सुनीता युवराज नवले, श्रावणी युवराज नवले या मायलेकींनी बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

यानंतर युवराज यांचा मुलगा स्वराज याने सकाळी बेडरूमचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. यानंतर स्वराज याने टेरेसवरून वडिलांना बोलावून आणले. त्यानंतर युवराज यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला असता मृत सुनीता आणि श्रावणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here