संतापजनक ! क्रूर आईची नऊ महिन्याच्या बाळाला बेदम मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक क्रूर आई आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी संबंधीत आईला अटक केली आहे.

https://twitter.com/satwantrissam/status/1513544274020745220

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला नऊ महिन्याच्या बाळाला मारहाण करताना दिसत आहे. हि महिला जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध घेत तिला अटक करून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून बाळ सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेच्या नातेवाईकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.