यंदा रक्षाबंधन लवकर झालं; पृथ्वीमातेने चांदोमामाला राखी बांधली; मन जिंकणारे मिम्स व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांद्रयान ३ काल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँड झाल्यानंतर भारताने एक मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. भारताच्या या यशानंतर देशात सर्वत्र उत्साह आणि आनंद साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर सुद्धा भारताचे हे यश अनोख्या आनंदात साजरं केलं जात असून मिम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. यातच ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका मिम्सने सर्वांचे मन जिंकले आहे.

पृथ्वीमातेने आपल्या चांदोमामाला राखी बांधली, यंदा रक्षाबंधन लवकर झालं असं या व्हायरल झालेल्या मिम्स मध्ये दिसत आहे. तसेच राखीचा फोटोही दिसत आहे. ही राखी म्हणजेच भारताने चंद्रावर पाठवलेले विक्रम लॅन्डर हे यान आहे. हे मिम्स पाहून तुम्हीही भावनिक झाल्याशिवाय राहणार नाही. लहानपणा पासून आपण पृथ्वीला माता म्हणतो, आणि चंद्राला प्रेमाने चांदोमामा म्हणतो. त्यामुळे आपली ही धरणीमाता यंदा आपल्या लाडक्या मामाला राखी बांधताना बघून नक्कीच तुमचं मन खुलून जाईल. या मिम्स व्यतिरिक्त सोशल मीडियावर अनेक मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. यूजर्स वेगवेगळ्या पोस्ट करत आनंद साजरा करत आहेत.

दरम्यान, संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेले भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिल देश बनला आहे. यामुळे जागतिक पटलावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचून ISRO ने एक नवा इतिहास रचला आहे. या कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांची आभार मानले. भारताचे विक्रम लॅन्डर तब्बल ४० दिवसांनी चंद्रावर पोहचले असून आता सलग १४ दिवस हे चंद्राचा अभ्यास करेल.