सासूने जावयाला पेट्रोल टाकून पेटवले; कुठे घडला धक्कादायक प्रकार?

Mother-in-law sets fire to son-in-law
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे जावयाच्या प्रत्येक शब्दाला सर्वात जास्त महत्व दिले जाते. त्याचा मान ठेवणे हे मुलीची कुटुंबीयांचे कर्तव्यच असते. मात्र बिहारमधील वैशाली जिल्हात याच्या उलट एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका सासूनेच आपल्या जावयावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर पाटणा पीएमसीएचमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र याघटनेमुळे संपूर्ण वैशाली जिल्हा हदरला आहे. तसेच आरोपी सासूच्या विरोधात जवळील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, विकास कुमार जखमी झालेल्या जावयाचे नाव असून तो बसंतपूर गावातील रहिवासी आहे. गेल्या वर्षीच त्याचे कर्णेजी गावातील नेहा कुमारीशी लग्न केले होते. महत्वाचे म्हणजे, या दोघांनी लव्हमॅरेज केल्यामुळे ते नेहाच्या घरच्यांना मान्य नव्हते. नेहा दिसायला एक सुंदर तरुणी आहे. मात्र तिने एका काळ्या रंगाच्या मुलाशी लग्न केल्यामुळे नेहाची आई या दोघांवर देखील नाराज होती. मध्यंतरी नेहाला दिवस गेल्यामुळे ती माहेरी आली होती.

मात्र ज्यावेळी विकास नेहाला परत आणायला गेला तेव्हा तिच्या आई वडिलांनी त्याच्याशी वाद घातले. आणि मुलगी परत पाठवणार नाही हे बजावून सांगितले. याप्रकरणी जबाब देत विकासने पोलिसांना सांगितले की, तो त्यांच्या वडिलांसोबत नेहाला आणायला गेला असता तिच्या वडिलांनी शिवीगाळ केली. त्यामुळे आम्ही तेथून निघून आलो.

मात्र तो घरी परतल्यानंतर नेहाने पुन्हा त्याला बोलवून घेतले. परंतु तो सासरी गेल्यानंतर सासूने त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्वरीत विकासला गावकऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान विकास ७५ टक्के जळाल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सासूवर देखील कारवाई करण्यात आली आहे.