संतापजनक ! मुलीने प्रियकराच्या नावे कुंकू लावल्याने सख्ख्या आईने केली मुलीची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आईने आपल्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. आपल्या मुलीचे असणारे प्रेमसंबंध मान्य नसल्याने आईनेच आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि प्रियकराने तिला मारलं असल्याचा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात या सर्व घटनेचा उलगडा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील वैदपुरा गावात प्रियंका नावाच्या मुलीचं त्याच गावातील राजकुमार नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रियंकाच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण प्रियांका आपल्या निर्णयावर ठाम होती.

कुंकू लावल्याचा आला राग
एक दिवस प्रियंका आणि तिची आई निर्मला देवी या बाजारात गेल्या होत्या. बाजारातून घरी आल्यानंतर प्रियंकानं कुंकू घेतलं आणि ते लावलं. आईने कुंकू का लावत असल्याचे विचारले तेव्हा आपण आपल्या प्रियकराच्या आणि होणाऱ्या पतीच्या नावे हे कुंकू लावत असल्याचं तिनं सांगितलं. यानंतर निर्मला देवीने रागाच्या भरात पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला आहे.

अशा प्रकारे रचला बनाव
आईने मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह फासावर लटकावला आणि हत्येचा बनाव रचला. प्रियंकाला त्रास देणारा गावातील राजकुमार नावाचा तरुण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रियंकाचा खून केल्याचा आरोप प्रियांकाच्या आईने केला होता. प्रियंकाच्या वडिलांनी तशी रितसर तक्रारसुद्धा नोंदवली आहे. पोलिसांनी तीन पथकं तयार करून या घटनेचा तपास सुरू केला. तपास करत असताना प्रियंकाच्या डोक्यावरील कुंकू पाहून पोलिसांना संशय आला. त्यातूनच आईनेच तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी निर्मला देवीवर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment