कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 8 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये 2 वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचाही समावेश होता. या कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 185 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व तिचा 2 वर्षाचा मुलगा, खराडे-हेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, कालेवाडी-पाटण येथील 46 वर्षीय पुरूष, मारूल-दिवशी येथील 27 वर्षीय युवक, सळवे-पाटण येथील 45 वर्षीय महिला हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी आकाश चौगले, डॉ. नसिमा कणसे, डॉ. हर्षाली पाटील, डॉ. शालू शर्मा, कृष्णा हॉस्पिटलचे कर्मचारी शंकर पाटील, मुसा मुल्लाणी, दिपक कदम, पोपट जाधव, गणेश पाटोळे, जयंत शिंदे, अमोल कांबळे व बबन कदम यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ज़ी. सी. पाटील, डॉ. विनायक राजे, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.