बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे बऱ्याच गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांमधील नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे. यादरम्यान एक मन सुन्न कारणारा व्हिडिओ समोर आला आहे. एक आई आपल्या मुलासाठी जीवही (mother travels through floods on tires) धोक्यात घालू शकते, याचा प्रत्यय या व्हिडिओमधून आला आहे.
गावात पूर आल्याने आपल्या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी आईने पुराच्या पाण्यातून टायरवर केला प्रवास pic.twitter.com/nWNee4kCTh
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 21, 2022
काय आहे प्रकरण ?
काळेगाव गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे असा प्रश्न काळे कुटुंबासमोर होता. यावेळी मुलाच्या आईने टायरवर बसून पुरातून (mother travels through floods on tires) आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी नेलं. पाच ते सहा फूट खोल पाण्यातून जीव मुठीत धरून या महिलेने आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी (mother travels through floods on tires) मलकापूर येथे नेले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संततधार पावसामुळे मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क तालुक्यापासून तुटला आहे. कारण गावाच्या चारही बाजूने विश्र्वगंगा नदीने वेढलेलं (mother travels through floods on tires) आहे आणि तालुक्यात येण्यासाठी गावाला फक्त एकच मार्ग आहे. तो म्हणजे हरसोडा मार्गे मलकापूर. मात्र, मध्ये असलेल्या पुलावरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावाकडे लक्ष द्यावं, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर