देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Moto G32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Motorola ने 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला Moto G32 हा स्मार्टफोन केला होता. या फोनला अपग्रेड करत आता कंपनीने 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 33W फास्ट चार्जिंग असलेला 5000mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Moto च्या या नवीन व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये असेल. 22 मार्चपासून फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून त्याची विक्री सुरू होईल. या फोनमध्ये ग्राहकांना सॅटिन सिल्व्हर आणि मिलर ग्रे असे दोन कलर ऑप्शन मिळतील.

Motorola Moto G32 tem design reforçado em renderizações de alta qualidade -  TudoCelular.com

हा नवीन Moto G32 मध्ये Android 12 देण्यात आला आहे. ThinkShield च्या सिक्योरिटी सहित या फोनला वॉटर आणि डस्टरेझिस्टन्ससाठी IP52 रेटिंग देखील मिळाले आहे. यामध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट आणि 1,080×2,400 पिक्सेल रिझोल्यूशन असेल.

Moto G32 with 90Hz display, Snapdragon 680 SoC goes official: price and  specifications | 91mobiles.com

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास Moto G32 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 50 मेगापिक्सेल प्राइमरी, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससहीत येईल. त्याचप्रमाणे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच सिक्योरिटीसाठी यामध्ये फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Moto G32 Budget Smartphone Launched In India: Price, Specifications And More

या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि स्पोर्ट्स स्टिरीओ स्पीकरसहीत डॉल्बी एटमॉस सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि ड्युअल मायक्रोफोन देखील उपलब्ध आहेत. या नवीन Moto G32 मध्ये 5,000mAh बॅटरी दिली गेली आहे जी 30W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.2 आणि NFC उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/motorola-g32-mineral-gray-64-gb/p/itmdcfa4c4022714

हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न