गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

दिवसेंदिवस महागाई वाढत असून, नागरिकांचे आर्थिक बजट कोसळले आहे. दरवाढ कमी न केल्यास राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव यांनी जत येथे दिला. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात जतमध्ये शनिवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी अक्की यांची प्रमुख उपस्थिती होती.

मीनाक्षी अक्की म्हणाल्या की,”महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण बनले आहे. पण भाजप सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.” जिल्हाध्यक्षा जाधव म्हणाल्या की,” दररोजच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे असे असले तरी केंद्रातील मोदी सरकारला त्याचे काहीच देणे-घेणे नाही. वाढत्या महागाईला आळा घालण्यास केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.”

या आंदोलनात पूजा लाड, गीता. कोडग, सुवर्णा अलगुर, नयना सोनवणे, प्रतिभा पाटील, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब व शिवाजी शिंदे, मच्छिंद्र वाघमोडे सहभागी झाले होते.

Leave a Comment