साताऱ्यात महावितरण कंत्राटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार निदर्शने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके

आजपासून केंद्र वि राज्य सरकारच्या विरोधात महावितरणच्या संघटनाच्यावतीने दोन दिवसीय आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान आज महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने महावितरण सातारा मंडल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत मार्गदर्शनही करण्यात आले. “केंद्र सरकार व राज्य सरकार कामगार कायदे मोडीत काढत आहे तसेच देशातील व राज्यातील वीज क्षेत्राचे खाजगीकरण करूण खाजगी भांडवलदाराच्या घशात देण्याचा डाव आखला आहे.”

[better-ads type=’banner’ banner=’197269′ ]

“खाजगीकरण झाले तर शेतकरी, घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीज ग्राहकांनाअतिशय महागाडी वीज खरेदी करावी लागेल आणि संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यातील वीजग्राहक देशोधडीला लागल्या शिवाय राहणार नाही. आपण सर्वजन शेतकरी व वीज ग्राहकांच्या कुटुंबातील आहोत. वीज क्षेत्र आपल्या सर्वांना वाचवायचे आहे आणि शेतकरी वीजग्राहक सुध्दा आपल्या बाजुने नक्की येतील,” असे संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव काॅ. नानासाहेब सोनवलकर, सर्कल सचिव काॅ. साहेबराव सावंत, विभागीय सचिव काॅ. अनिलराव शिदे, सबाॅर्डीनेट इजिनिंअर असोशिएशनच्यावतीने पुणे रिझनल पदाधिकारी जितेद्रजी माने, सातारा सर्कलचे जाॅईन्ट सेक्रेटरी प्रशांत वाघ, कराड पारेषण सिव्हीलचे जाॅईन्ट सेक्रेटरी सानप, लाईनस्टाफ असोशिएशन संघटनेचे पदाधिकारी अशोक फाळके, विवेक भागवत यांनी मनोगत व्यक्त केली.

Leave a Comment