हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Movies : कोणताही चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनसाठी जवळपास तीन ते सहा महिने तर प्रिन्सिपल फोटोग्राफीसाठी एक ते दोन महिने आणि यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनसाठी सहा महिने ते एक वर्ष लागेल. एकंदरीत काय कि, चित्रपट बनवण्याची प्रक्रिया खूप जटिल आहे. त्यासाठी कित्येक महिने खर्च करावे लागतात. मात्र इतका वेळ आणि भला मोठा खर्च करूनही बनवलेला चित्रपट हिट होईल याची काही शाश्वती नाही. असे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याचे आपण अनेकदा पहिले आहेत.
मात्र असेही काही चित्रपट आहेत जे अवघ्या काही दिवसांत बनून रिलीज देखील झाले आणि हिट देखील झाले. चला तर मग आज आपण अशाच काही कमीत कमी दिवसात शूट केलेले आणि जबरदस्त हिट ठरलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊ…

जॉली एलएलबी 2 : अक्षय कुमारच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या जॉली एलएलबी 2 चे बजट कमी होते. अत्यंत कमी बजटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 30 दिवसांत पूर्ण झाले. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत सौरभ शुक्ला आणि कुमुद मिश्रासारखे कलाकारही होते. एका वकिला भोवती फिरणारी ही कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला. Movies

तनु वेड्स मनू : आर. माधवन आणि कंगना राणावत यांची भूमिका असलेल्या तनु वेड्स मनूच्या या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर तनु वेड्स मनू रिटर्न्सने देखील तिकीट खिडकीवर जोरदार यश मिळवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन देखील केले. फक्त महिनाभरातच शूटिंग पूर्ण झालेला हा सर्वोत्तम चित्रपट ठरला. लग्न झालेल्या जोडप्यांमधील धुसफूस अत्यन्त चांगल्या पद्धतीने यामध्ये चित्रित करण्यात आली. जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. Movies

काबिल : हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची भूमिका असलेला काबिल हा खुंतोच सुंदर चित्रपट होता. यामध्ये हृतिकने एका अंध व्यक्तीची भूमिका केली होती. यामध्ये यामीला त्याची पत्नी म्हणून दाखविण्यात आले होते. चांगली कथा आणि त्याहून चांगल्या कलाकारांचा भरणा असलेल्या हा चित्रपट 88 दिवसांत रिलीजसाठी सज्ज झाला होता. Movies

धमाका : कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली होती. OTT वर रिलीज झालेला हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात कमी दिवसांमध्ये शूट झालेला चित्रपट आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकने अवघ्या 10 दिवसांत हा चित्रपट पूर्ण केला होता. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांकडून खुंतोच छान प्रतिसाद मिळाला. Movies

हरामखोर : धमाकाप्रमाणेच ‘हरामखोर’ हा चित्रपट देखील अत्यंत कमी वेळात चित्रित झालेला सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मिर्झापूर फेम श्वेता त्रिपाठी यांनी भूमिका केल्या आहेत. एका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याविषयीची ही कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. Movies
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.imdb.com/title/tt2361746/
हे पण वाचा :
EPFO : EPF पेन्शन योजनेशी संबंधित 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार ???
Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!
Airtel च्या ‘या’ 4 प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल एका महिन्याची व्हॅलिडिटी !!!
Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या




