हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी 16 जून पासून आंदोलनाची घोषणा केली. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर आता खुद्द खासदार संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली असून “मी कधीही मोर्चा काढणार असं म्हणालो नव्हतो”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. मी मूक आंदोलनाची भूमिका घेतली आणि चंद्रकांत पाटील काही म्हणो’ असा टोला संभाजीराजेंनी लगावला आहे.
कोण दिलशभुल करतंय? हे सर्वांना माहिती आहे. चंद्रकांतदादा पाटील लाख म्हणत असतील. मी मोर्चा म्हटलेलो नाही. मूक आंदोलन करणार हीच भूमिका. आता लोकप्रतिनिधी बोलावं, ही भूमिका आहे, असं म्हणत संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते –
तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात. या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. संभाजी राजे यांनी आधी मोर्चा काढतो म्हटल, नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटला. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हटला. नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.