व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून निधी आणण्यासंदर्भात संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती, म्हणाले..

बीड । मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक मात्र जबाबदारी केंद्राची की राज्याची यावर वाद घालत आहेत. या पार्श्वभुमीवर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारकडून राज्यासाठी निधी आणण्यासंदर्भात विनंती केलीय. राज्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी केंद्राचीदेखील आहे असं भोसले यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे संभाजीराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

”शेतकऱ्यांना मदत करताना केंद्राने पैसे द्यायला पाहिजे असतील तर केंद्रानं द्यावे किंवा राज्याने द्यावे. राज्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी केंद्राची देखील आहे. दोघांनीही शेतकऱ्यांची परीक्षा बघू नये. माझी देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे कि, तुम्ही हा विषय पंतप्रधान मोदींजवळ मांडावा. माझ्याकडून जे पर्यंत होतील ते मी करणारचं” असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

दरम्यान, फडणवीस यांनी केंद्र सरकारने मदत द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना फटकारले. एरवी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद आहेत. मात्र, केंद्राने मदत द्यावी, या मुद्द्यावर तिन्ही पक्ष एकमताने बोलतात. एकूणच तिन्ही पक्ष हात झटकण्यात तरबेज आहेत. केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत नक्कीच देईल. पण राज्य सरकारने प्रथम आपण काय मदत देणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”