अर्ज दाखल करण्याचा २६ मार्च हा शेवटचा दिवस
परभणी प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीतील विविध पक्षांचे उमेदवारांच्या उमेद्वारांची अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
परभणी लोकसभा मतदार संघातून सोमवारी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यासह १० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
परभणी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २६ मार्च हा शेवटचा दिवस आहे.
त्यामुळे २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी शक्तीप्रदर्शन करीत भारिप बहुजन महासंघाकडून २ तर वंचित बहुजन आघाडीकडून २ उमेदवारी अर्ज दाखल केले. कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांनीही रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला.
याशिवाय शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांनीही मोजक्याच कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केले़ दरम्यान, मुख्य उमेदवारांसह सोमवारी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे यशवंत रामभाऊ कसबे, बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेख इब्राहीम, अपक्ष संगीता कल्याणराव निर्मळ, डॉ़ आप्पासाहेब ओंकार कदम, किशोर बाबूराव मुन्नेमाणिक, सखाराम ग्यानबा बोबडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले़ सोमवारी १४ इच्छुकांनी २२ अर्ज निवडणूक विभागातून घेतले़