हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार संभाजी छत्रपती यांच्यानंतर आता सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
बंगळुरुमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.
संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 18, 2021
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार झाल्यानंतर आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रणरागिणीनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. त्यांनी बेळगाव मध्ये शिवाजी गार्डन या ठिकाणी दुग्धाभिषेक घालत केल अभिवादन केले.