सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या ना कोणत्या कारणातून कायम चर्चेत असतात. राजे कधी काय करतील याचा नेम नाही. याच कारणामुळे त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतो. आता उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांच्या जिप्सी राईडमुळे. पहिल्यापासूनच त्यांना चारचाकीची राईड कायम आवडते. याआधीही आपण उदयनराजेचे भरधाव वेगाने गाडी चालवणारे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र ,आज चक्क डोक्यावर आडवी गांधी टोपी घालून आपल्या हटके स्टाईलनी चक्क 120 च्या स्पीडमध्ये त्यांनी त्यांची आवडती जिप्सी गाडी जलमंदिर निवासस्थानी चालवली आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच शेतकरी पोशाख करत गांधी टोपी परिधान करून जिप्सी राईड मारली. यावेळी त्यांनी नुसतीच राईड मारली नाही तर पुष्पा या सिनेमातील ‘मै झुकेगा नही, साला…’ हा डायलॉगही मारला. जिप्सीच्या सायलेन्सरमधून जोरदार फायरिंगचा आवाज करत त्यांची ही जिप्सी राईड मारून पुन्हा अनोखी अदा सर्वांना पाहायला मिळाली.
खासदार उदयनराजेंची जलमंदिर येथे जिप्सी राईड पुन्हा चर्चेत pic.twitter.com/yZxZTr53xc
— santosh gurav (@santosh29590931) March 13, 2023
उदयनराजे भोसले यांना गाड्याचा भरपूर छंद आहे. आतापर्यंत उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी, बीएमडब्लू या आलिशान गाड्या आहेत. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे पोलो ही कार आहे. उदयनराजे तरुणाईत भलतेच ‘फेमस’ आहेत. सोशल मिडियावर तर त्यांचे लाखो फाॅलोवर असून त्यांच्या स्टाईलची अनेक जण काॅपी करतात. साताऱ्यात उदयनराजेंचे समर्थक जेव्हा नवीन गाडी विकत घेतात तेव्हा ते उदयनराजेंना जरुर दाखवायला येतातच. अनेक वेळा स्वतः उदयनराजेंनी त्याची रायडिंग केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.