हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. या मुद्द्यावर राज्य सरकारनं पुढाकार घ्यायला हवा होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो का घेतला नाही?, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं आहे
उदयनराजे म्हणाले, “मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही, तर शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारित समाजाच्या भूमिकेतून बोलत आहे. आपल्या आधीची जी पिढी राजकारणात आहे त्यांना मला प्रश्न वाचारायचा आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? हा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहे. आपली पुढची पिढी आपल्याला जाब विचारेल तेव्हा शरमेने मान खाली घालावी लागेल. या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं कारण आजही तेच सत्तेत आहेत.”
इतरांचा अधिकार कमी करा अशी मागणी मराठा समाजाने कधीच केली नाही. पण आमच्यावर अन्याय का? ज्यांनी अन्याय केला ते आज सत्तेत आहेत. अन्य समाजाचं आरक्षण, अधिकार अबाधित ठेवा. पण मराठा समाजावर अन्याय का?, आज जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे
मराठ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांना ही उपमा किती लागू होते?, ज्या लोकांनी तुम्हाला सन्मान दिला, त्या लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडाल्यावर तेच तुम्हाला खाली खेचतील. अन्य समाजाचं आरक्षण, अधिकार अबाधित ठेवा. पण मराठा समाजावर अन्याय का?, आज जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. असा आरोप उदयनराजे यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’