मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो – उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेल असून विरोधी पक्षाकडून सरकार वर टीकास्त्र सोडलं जात आहे. आता याच मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण आज त्यांना नावं ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा, असं थेट आव्हानच उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिलंय. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर अद्याप राज्य सरकारनं कुठलीही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं कामच आजपर्यंत झाल्याची टीकाही उदयनराजे यांनी केलीय.

मराठ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांना ही उपमा किती शोभा देते? असा सवालही उदयनराजे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही मराठा नेत्यांना विचारला आहे. यावेळी त्यांनी नाव घेणं मात्र टाळलं. पण त्यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होता, अशी चर्चा आता सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment