मुंबई प्रतिनिधी | मागील वर्षी राज्य परिवहन खात्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही त्यांची निवड रद्द झाल्याने आज संबंधित उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यां 832 उमेदवारांची भेट आज महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सायंकाळी घेतली. ‘जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळत नाही तो पर्यंत आपण संघर्ष करू, मी तुमच्या सोबत आहे’ असा शब्द दिला.
सद्यस्तिथीला ‘एमपीएससी’च्या अनेक नियुक्त्या हया रखडलेल्या आहेत. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सुद्धा अशाच प्रकारे कोंडी झाली आहे. महापरीक्षा पोर्टलच्या भोंगल कारभाराबाबतही अनेक विद्यार्थी हे मोर्चे व आंदोलन करीत आहेत.
सरकारच्या अशा दिरंगाईमुळे स्पर्धापरीक्षांवरील व इतर शासकीय परीक्षांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडत चाललेला दिसत आहे. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ ह्यानुसार रात्रंदिवस अभ्यास करुन मात्र 832 जणांच्या बाबतीत ‘प्रयत्नांती कोर्ट कचेरी’ आली आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने त्वरित दखल घेवून हया विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा.
परिवहन खात्यात एमपीएससी मार्फत सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही निवड न झाल्याने मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणा-या त्या 832 उमेदवारांची आज सायंकाळी भेट घेतली, आणि त्यांना नियुक्ती मिळत नाही तो पर्यंत आपण संघर्ष करू असा शब्द दिला. pic.twitter.com/X0h5Lfta7H
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 29, 2018