औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदासाठी आज सकाळी १० वाजता परीक्षेला सुरुवात झाली. यावेळी एमपीएससीची परीक्षा आणि दुसरीकडे कोरोनाशी लढा देत काही परीक्षार्थींनी एमपीएससी परीक्षेला हजेरी लावली. अशा परीक्षार्थींसाठी परीक्षा विभागाच्या वतीने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.
एमपीएससीच्या परीक्षेला सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात उमेदवारांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात आला. याशिवाय परीक्षार्थींच्या भवितव्याचा विचार करून काही कोरोनाबाधित परीक्षार्थींना देखील परवानगी देण्यात आली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर चार कोरोनाबाधितांनी पीपीई किट घालून परीक्षा दिली असल्याची माहिती एमपीएससी परीक्षा विभागाने दिली. सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येत आहे.
शहरातील एकूण ५९ केंद्रावर ही एमपीएससीची परीक्षा घेण्यात येत असून औरंगाबाद शहरात घेण्यात येणाºया परीक्षा केंद्रावर एकूण १९ हजार ६५६ उमेदवारांनी नोंद केली असून पोलिसांच्या कडक बंदोबस्तात एमपीएससी परीक्षेला सुरुवात झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षार्थींना मास्क घालूनच परीक्षा केंद्रावर यावेळी एमपीएससी परीक्षा विभागाच्या वतीने परीक्षार्थींना मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड ची किट देण्यात आली.
याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे लक्षणे आहेत अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवस्था करून पीपीई किट घालून परीक्षा देण्यासाठी परवानगी देण्यात आली. तसेच पोलीस कर्मचाºयांसह, केंद्रसंचालक आदी एकूण २ हजार १५६ कर्मचाºयांनी काम पाहिले. यात त्यांनी कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टसिंग ठेवून उमेदवारांना परीक्षा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच लक्षणे आढळून आलेल्या परीक्षार्थींना पीपीईकिटची देखील व्यवस्था, परीक्षा केंद्रावर स्यानेटाईझरची व्यवस्था करण्यात आली.
शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, होलिक्रॉस मराठी शाळा, होलिक्रॉस इंग्रजी माध्यमाची शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, बीड बायपास येथील एमआयटी महाविद्यालय, एन -४ येथील एमआयटी कॉलेज यासह आदी एकूण ५९ परीक्षा केंद्रावर परीक्षेला सुरुवात झाली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा