एमपीएससीची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला; या ‘6’ केंद्रावर होणार परीक्षा

0
88
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 4 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक जारी केलं आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावं, असे देखील आयोगाकडून सांगण्यात आलं आहे

मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत एमपीएससी आयोगाने या परीक्षांबाबत स्वतंत्र परिपत्रक काढलं. तसेच या परिपत्रकाद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 तसेच अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा यांच्या तारखा जाहीर केल्या.

या परीक्षा राज्यात एकूण सहा केंद्रावर आयोजित केल्या जाणार आहेत. औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर ,नाशिक, पुणे या जिल्ह्यांतील केंद्रावर या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here