हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची संघाच्या मेंटॉरपदी निवड करण्यात आली आहे. धोनीच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असून धोनीच्या अनुभवाचा मोठा फायदा भारतीय संघाला होणार आहे.
भारतीय संघात तब्बल पाच फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अश्विनला सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील एकाही कसोटीत स्थान देण्यात आलेले नसताना टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी मात्र, स्थान देण्यात आले आहे.
Former India Captain MS Dhoni (in file photo) to mentor the team for the T20 World Cup: BCCI Honorary Secretary Jay Shah pic.twitter.com/l7PChmS7yA
— ANI (@ANI) September 8, 2021
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे. पहिल्या गटात गत वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि महंमद शमी.
राखीव – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व दीपक चहर.