हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | लॉकडाऊन काळातील थकित वीजबिल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लवकरच वसूल करण्यास सुरुवात करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून थकीत असलेल्या 63 हजार 740 कोटी रुपयाच्या थकित वीजबिलामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे कंपनी लवकरच सर्व बिल वसुलीसाठी मोहीम मोहीम हाती घेणार आहे.
लॉकडाऊन काळात आलेले बहुतांशी बिले रखडली होती. त्यामधील कमर्शियल, रेसिडेन्सी आणि कारखानदारीसाठी असलेल्या विजबिलाच्या किमती या 8485 कोटी इतकी आहे. तर हाय होल्टेजसाठी दिलेला सप्लाय साठी 2435 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे विद्युत कंपनी डबघाईला आली आहे. त्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, ‘लॉकडाऊन मधले कुठलेही बिल माफ होणार नाही व सर्व बिले भरावे लागतील’.
सप्टेंबर 2020 पासून खाजगी कंपनी ‘महा एलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन’ MERC ने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोबत करार करून थकीत बिल वसुली करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबई आणि उपनगर मधील काही ग्राहकांची वसुली झाली त्यासाठी त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते.