MSRTC Bus Pass : फक्त 1170 रुपयांत फिरा संपूर्ण महाराष्ट्र; ST ने आणलाय स्पेशल पास

MSRTC Bus Pass 1170 rs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRTC Bus Pass। सध्या उन्हाळ्याचे दिवस या शाळांना या दिवसात सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकजण आपल्या मुलाबाळांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर कुठेतरी फिरायला जात असतात. महाराष्ट्रात उन्हाळ्यात फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या या दिवसात पर्यटन करण्याच्या विचारात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या ११७० रुपयांत संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करू शकता. होय, हे खरं आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडलंच्या “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही भागात तुम्ही प्रवास करू शकता. शासनाने 1988 पासून हि योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 7 दिवस आणि 4 दिवसांच्या कालावधीसाठी पास दिला जातो. लालपरी शिवाय तुम्ही शिवशाही मधूनही प्रवास करू शकता. परंतु शिवशाहीच्या पासचे दर वेगळे आहेत. साध्या बसेसमध्ये साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती (मिडी) आंतरराज्य या बसेसचा समावेश आहे. तर शिवशाही शिवशाही (आसनी) बससाठी पासचे (MSRTC Bus Pass) दर वेगळे आहेत.

जेष्टांसाठी- मुलांसाठी किती दर? MSRTC Bus Pass

तुम्ही चार दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला 1170 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 585 रुपये खर्च पडेल. जर तुम्ही 4 दिवसांच्या शिवशाहीचा पास घेतल्यास प्रौढांसाठी 1520 आणि लहान मुलांसाठी 765 रुपये द्यावे लागतील. तर जर तुम्हाला सध्या बसेसने ७ दिवसांचा प्रवास करायचा असेल तर प्रौढांसाठी 2040 रुपये द्यावे लागतील, तर लहान मुलांसाठी 1025 रुपये देऊन प्रवास करता येईल. तर दुसरीकडे शिवशाहीने 7 दिवसांचा प्रवास करायचा असेल तर मात्र प्रौढांसाठी 3030 आणि लहान मुलांसाठी 1520 रुपये द्यावे लागतील. पाच वर्षांच्या आतील मुलांना एसटी बस प्रवासात कोणतेही तिकिट लागत नाही. तर 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फूल तिकिट काढावे लागेल.