साहेब, तुम्हीच आमचे तारणहार, तुम्हीच आता लक्ष घाला; एस टी कर्मचाऱ्यांचा राज ठाकरेंपुढे टाहो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाच, केवळ राज ठाकरेच हा प्रश्न सोडवू शकतात असं म्हणत या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती त्यांच्याकडे केली.

साहेब, तुम्हाला हातजोडून विनंती आहे. आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल. पण आता वेतन आयोग लागू झाला नाही. पगार वाढला नाही तर आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा टाहो एसटी कामगारांनी आज  राज ठाकरेंसमोर फोडला.

“आम्ही महाराष्ट्राची सेवा करतोय, महाराष्ट्राला जोडतोय. पण दरवेळी आमच्या पगाराच्या वेळेस पैसे कसे नसतात. आता या १२ दिवसांच्या संपानंतर विलीनीकरण समिती स्थापन झाली, कोर्टाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागलं नाही तर बायकोला काय सांगायचं?,” अशा शब्दांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधिक मंडळाने राज यांच्यासमोर व्यथा मांडली.

Leave a Comment