ST महामंडळाचा चालकांना इशारा; मोबाईल वापरताना दिसल्यास होणार मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांसाठी महत्वाचा घटक. खिशाला परवडणारा आणि प्रवासासाठी सोयीचा असणारा पर्याय म्हणून एसटीकडे पाहिले जाते. परंतु सोयीचा प्रवास जेव्हा जीवघेणा होता तेव्हा मात्र त्याने प्रवास करणे अवघड जाते. तसेच एसटी चालकांचे गाडी चालवतानाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अनेक अपघातही घडल्याच्या घटना समोर आहेत. हीच गोष्ट ओळखून एसटी महामंडळाने सर्व चालकांना गंभीर इशारा दिला आहे. त्याबाबतीत जाणून घेऊयात.

मोबाईल चालवताना आढळल्यास होणार कारवाई

बस चालकांचे बस चालवताना मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. हे आढळून आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. त्यानुसार वाहन चालक मोबाईल वापरताना आढळून आल्यास त्यावर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गाडी चालवताना बस चालकांनी सावधगिरी बाळगावी आणि नियमाचे पालन करावे.

ST प्रवास सुरक्षित करण्यासाठी घेतला निर्णय

ST ने प्रवास करणे हे अनेकांना सोयीचा व सुरक्षित वाटतो. मात्र मागील अनेक दिवसांपासून हा प्रवास सुरक्षित होत नव्हता. चालकाच्या मोबाईल वापरामुळे अनेक ठिकाणी अपघात घडून आले. तसे व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसून आले होते. त्यामुळे लोकांमध्ये या प्रवासाबाबत संभ्रम निर्माण होत होता. म्हणून एसटीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी परिवहन मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

काय आहे परिपत्रकात?

वाहन चालवताना मोबाईल वापरू नका अश्या वेळोवेळी सूचना देऊनही चालक ऐकत नव्हते. त्यामुळे परिवहन मंडळाने परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये चालकाने आपला मोबाईल हा वाहकाकडे द्यावा. तसेच जर विनावाहक गाडी असल्यास चालकाने आपला फोन, हेडफोन आणि ब्लूटूथ बॅग मध्ये ठेऊन द्यायचा आहे. असे परिपत्रकात सांगितले आहे. आता चालक महामंडळाच्या या नियमाचे पालन नेमकं कशा पद्धतीने करतात आणि या नियमामुळे अपघाताचे प्रमाण कमी येत का हे आता पाहावे लागेल.