म्युकरमायकोसिस हवेतूनही पसरू शकतो; एम्सच्या डॉक्टरांनी दिला सावधानतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाच रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत आली असली तरी म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucormycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. राज्यात देखील या नवीन रोगाचे अनेक रुग्ण आढळत असताना आता एम्स चे डॉक्टर निखिल टंडन यांनी मात्र चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. म्युकरमायकोसिस हवेतूनही पसरू शकतो अस त्यांनी म्हंटल आहे.

एम्सच्या डॉक्टरांनी काळ्या बुरशीबद्दल बरेच काही सांगितले आहे. एम्सचे डॉक्टर आणि प्राध्यापक डॉ. निखिल टंडन म्हणाले की हा रोग हवेच्या माध्यमातून देखील पसरू शकतो परंतु जोपर्यंत आपलं शरीर या विरुद्ध लढु शकत तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. हा रोग फुफ्फुसात देखील पसरू शकतो पण याची शक्यता खूप कमी आहे.

ब्लॅक फँगसची काय आहेत लक्षणे –

ब्लॅक फंगसमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.

काय काळजी घ्यावी –

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा. तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment