मुकेश अंबानी देणार 6G इंटरनेट, ते सुद्धा अगदी स्वस्तात

Jio 6G internet
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवीन प्लॅन आणतच असतात. तसेच त्याद्वारे ग्राहकांना कसा फायदा होईल हे देखील ते पाहतात.  आता याहीवेळी त्यांनी हाच विचार करत ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. मुकेश अंबानी लवकरच आता ग्राहकांसाठी 6G इंटरनेट सुविधा आणणारं आहेत ते सुद्धा अगदी स्वस्त दरात… चला याबाबत जाणून घेऊया.. त्यामुळे ग्राहकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

5G चे 6G मध्ये  रूपांतर करण्यास अडचण येणार नाही

ग्राहकांसाठी 6G ही इंटरनेट सुविधा आणण्यासाठी सरकारला पत्रक द्यावे लागते. ते काम अंबानी यांनी पूर्ण केले असून आता 5G चे 6G मध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक अडचणी येतील असे वाटत होते. मात्र आता कंपनीच्या ग्राहक संख्येवरून असे लक्षात आले आहे की, रूपांतर करताना कोणतीही अडचण येणार नाही.

कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल?

अंबानीची कंपनी ही ग्राहकांसाठी नेहमीच प्लॅन करत असते. त्यातील प्लॅन वापरणाऱ्यांची संख्या ही जिओ, एअरटेल आणि वोडाफोन च्या तुलनेत ती 2.5 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे इंटरनेट प्लॅनच्या होणाऱ्या या नव्या बदलामुळे कंपनीला कोणतेही आर्थिक नुकसान झेलावे लागणार नाही. दुसरीकडे, रिलायन्स जिओ देखील स्पेस फायबरसाठी सज्ज आहे. यामुळे देशातील करोडो गावांना स्वस्त दरात चांगल्या दर्जाचे इंटरनेट मिळणार आहे. जिओने जर खरच लवकरात लवकर 6G इंटरनेट आणलं तर बाकी टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.